एके दिवशी येशूने आपल्या शिष्यांपैकी पेत्र, याकोबा व योहान हया तिघांना त्यांच्या बरोबर घेतले. हा योहान बाप्तिस्मा करणारा योहान नव्हे) ते सर्व उंच डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी चढून गेले.
येशू प्रार्थना करत असतांना अचानक त्याचा चेहरा सूर्यासारखा चमकू लागला आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र दिसू लागली.
तेंव्हा मोशे व संदेष्टा एलिया हे त्या ठिकाणी प्रकट झाले. ही माणसे शेकडो वर्षापूर्वी पृथ्वीवर होऊन गेली होती. त्यांनी येशूच्या पृथ्वीवरील यरुशलेमेमध्ये होणार्या मृत्यूविषयी घोषणा केल्या होत्या.
मोशे व एलिया येशूबरोबर संभाषण करत असताना, पेत्र येशूला म्हणला,‘‘आम्ही येथेच राहावे हे बरे आहे, येथे आपण तीन तंबू बववू या. एक मोशेसाठी, एक एलियासाठी व एक आपणासाठी पेत्रे काय बोलत होता हयाचे त्याला भान नव्हते.
पेत्र बोलत असतानाच एक शुभ्र मेघाने येउन त्यांना वेढिले व वरुन स्वर्गातून आकाशवाणी झाली,‘‘हा माझा परमप्रिय पुत्र आहे. मी याजविषयी संतुष्ट आहे. त्याचे तुम्ही ऐका’’ ते तिन्ही शिष्य खूप भयभित झाले व भूमिवर खाली पडले.
तेंव्हा येशूने त्यांना स्पर्श करुन म्हटले,‘‘भिऊ नका. चला उठा.’’ जेंव्हा ते उठले तेंव्हा येशूला सोडून सभोवताली त्यांना इतर कोणी दिसले नाही.
येशू आणि ते तीन शिष्य पुन्हा पर्वताच्या खाली उतरले. तेंव्हा येशू त्यांना म्हणाला की याविषयी कोणाला काही सांगू नका. मी लवकरच मरेल व पुन्हा जिवंत होईल. त्यानंतर तुम्ही याविषयी लोकांना सांगू शकता.’’