Open Bible Stories Home

24. योहान येशूचा बाप्तिस्मा करितो

बायबल कथा: मत्तय 3; मार्क 1:9 - 11; लूक 3: 1 - 23

जखर्या आणि अलिशिबा यांचा पुत्र मोठा होऊन एक संदेष्टा बनतो. तो जंगलामध्ये राहत असे, रानमध व टोळ खात असे आणि त्याची वस्त्रे ऊंटाच्या कातडीपासून बनविलेली होती.

योहानाचे भाषण ऐकण्यासाठी अनेक लोक जंगलामध्ये जाऊ लागली. त्याने त्यांस प्रचार केला,‘‘पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे!’’

योहानाचा संदेश ऐकून अनेक लोकांनी पश्चाताप केला आणि योहानाने त्यांना बाप्तिस्मा दिला. अनेक धार्मिक पुढारी देखील बाप्तिस्मा घेण्यासाठी आले, परंन्तु त्यांनी आपल्या पापांविषयी खरा पश्चाताप केला नव्हता व आपले पाप कबूल केले नव्हते.

योहोन त्या धार्मिक पुढार्यांना म्हणाला,‘‘सापाच्या पिल्लांनो! पश्चाताप करा आणि आपला मार्ग बदला. प्रत्येक झाड जे चांगले फळ उत्पन करत नाही, त्यास अग्निमध्ये टाकण्यास येईल. संदेष्टयांच्या या वचनाची पूर्णता योहानाने केली, ‘‘पहा, मी आपला दूत तूझ्याकडे पाठवित आहे, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.’’

काही यहूद्यांनी योहानाला तो मसिहा आहे की काय असे विचारले. योहान म्हणला,‘‘मी मसिहा नाही, परंतू माझ्या मागून एकजण येत आहे. तो एवढा महान आहे की, त्याच्या वाहणेचा बंध सोडण्याची माझी पात्रता नाही.’’

दूसर्या दिवशी येशू योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आला. योहानाने त्यास पाहून म्हटले,‘‘पाहा! देवाचा कोकरा जो संपूर्ण जगाचे पाप हरण करणार होय.’’

योहान येशूला म्हणाला,‘‘मी तुला बाप्तिस्मा देण्यास योग्य नाही. तूच मला बाप्तिस्मा देण्याची आवश्यकता आहे. परंतू येशू त्यास म्हणाला,‘‘तु मला बाप्तिस्मा दे, कारण देवाच्या दृष्टिने हे योग्य आहे.’’ तेंव्हा योहानोने त्याला बाप्तिस्मा दिला, जरि येशूने काहीच पाप केले नव्हते.

जेव्हा येशू बाप्तिस्मानंतर पाण्यातून वर आला, तेंव्हा देवाचा आत्मा कबूतराच्या रुपामध्ये येऊन त्याच्यावर थांबला. त्याचवेळी आकाशवाणी झाली,‘‘तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुज विषयी मी संतुष्ट आहे.’’

देवाने योहानास सांगितले होते, ‘‘तू बाप्तिस्मा दिलेल्या ज्या वक्तिवर पवित्र आत्मा उतरुन येईल. तोच व्यक्ति देवाचा पुत्र असेल’’ एकच देव आहे. परन्तु जेव्हा योहानाने येशूला बाप्तिस्मा दिला, तेंव्हा त्याने देवपिता बोलत असलेला पाहिला, देवपुत्र येशू, आणि पवित्र आत्म्यासही त्याने पाहिले.

Next Chapter