बाप्तिस्म्यानंतर लगेच पवित्र आत्मा येशूला घेऊन जंगलामध्ये जातो, त्या ठिकाणी येशू चाळीस दिवस व चाळीस रात्र उपवास करतो. तेव्हा सैतानाने तेथे येवून येशूची परीक्षा पाहिली.
सैतानाने येशूला मोहात पाडले,‘‘जर तू खरोखर देवाचा पुत्र आहेस, तर हया दगडांस भाकरी होण्याची आज्ञा कर म्हणजे तूला भोजन मिळेल!’’
येशूने उत्तर दिले,‘‘देवाच्या वचनामध्ये असे लिहिले आहे,‘मनुष्य केवळ भाकरीनेच नव्हे, तर देवाच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेन!’’
मग सैतान येशूला घेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले,‘‘तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील, आणि तुझा पाय धोंडयावर आपटू नये म्हणून ते तूला हातांवर झेलूप धरतील.’’
परन्तु येशूने सैतानाला धर्मशास्त्रातूनच उत्तर दिले. तो म्हणला,‘‘देव आपल्या वचनास सांगतो,‘तू आपला देव परमेश्वर याची व्यर्थ परीक्षा पाहू नकोस.’’
मग सैतानाने येशूला जगातील सर्व राज्ये व वैभव दाखविले व म्हणाला,‘‘जर तू मला पाया पडून नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईल.’’
येशूने म्हटले,‘‘अरे सैताना, चालता हो! देव आपल्या वचनामध्ये लोकांस आज्ञा करितो, परमेश्वर तुझा देव हयाला नमन कर व केवळ त्याचीच उपसना कर!’’
अशा प्रकारे येशू सैतानाच्या परिक्षेत बळी पडला नाही, म्हणून सैतान तेथून निघून गेला. तेंव्हा देवदूतांनी येऊन येशूची सेवा केली.