Open Bible Stories Home

6. परमेश्वर इसाकास मदत करतो

बायबल कथाः उत्त्पत्ति २४:१-२५-२६

जेव्हा आब्राहम म्हातारा झाला होता, तेव्हा इसाक तारूण्याच्या उंबरठ्यावर होता. म्हणून आब्राहमने आपल्या दासांना त्याचे नातेवाईक राहत असलेल्या प्रदेशामध्ये इसाकासाठी बधू आणण्यासाठी पाठविले.

खूप लांब प्रवास केल्यानंतर अब्राहमचे नातेवाईक राहात असलेल्या ठिकाणी देवबाप त्या सेवकास रिबेकाकडे घेऊन येतो. ती आब्राहमच्या भावाची नात होती.

रिबेका आपल्या बापाचे घर सोडून त्या सेवकाबरोबर इसाकाच्या घरी जाण्यास तयार झाली. ती आल्याबरोबरच इसाकाने तिच्याशी विवाह केला.

ब-याच वर्षांनंतर आब्राहम मरण पावला व देवाने त्याला दिलेली सर्व अभिवचने इसाकाकडे कराराच्या रूपामध्ये देण्यात आली. देवाने आब्राहमास असंख्य संतती देण्याचे अभिवचन दिले होते, परंतु इसाकाची पत्नी रिबेकास मुलबाळ नव्हते.

इसाकाने रिबेकासाठी प्रार्थना केली व देवाच्या कृपेने ती गरोदर राहीली. तिच्या गर्भाशयामध्ये दोन जुली मुले होती. ही दोघे जुळे मुले रिबेकाच्या गर्भामध्ये असतांनाच एकमेकांशी झगडू लागली तेव्हा तिने देवाला विचारले की असे का होत आहे.

देव रिबेकास म्हणाला, “तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत.” “तुझ्या उदरातून दोन वंश निघतील; एक वंश दुस-या वंशाहून प्रबळ होईल; आणि वडील धाकट्याची सेवा करील.”

जेव्हा रिबेकाच्या मुलांचा जन्म झाला, तेव्हा पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते; त्याचे नांव एसाव ठेविले. त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ एसावाची टाच पकडून बाहेर आला आणि त्याचे नाव याकोब ठेवण्यात आले.

Next Chapter