शेवटी आता इस्त्राएल्यांनी वचनदत्त देशामध्ये जाण्याची संधी मिळाली. यहोशवाने कनानी शहर यरिहो नगर जे मोठ्या वेशींनी सुरक्षित केले गेले होते, दोन जासूदांस हेरगिरी करण्यास पाठविले. त्या शहरामध्ये राहाब नावाची एक वेश्या राहत होती. तिने त्या जासूदांना आपल्या घरामध्ये लपविले व नंतर त्यांची सुटका करण्यास मदत केली. तिने देवावर विश्वास ठेवल्यामुळे असे केले. त्यांनी यरिहो नगर ताब्यात घेतल्यानंतर राहाब व तिच्या घराण्याचे रक्षण करण्याचे वचन दिले.
इस्त्राएल्यांना वचनदत्त देशामध्ये प्रवेश करण्यासाठी यार्देन नदी पार करणे अगत्याचे होते. देवाने यहोशवास सांगितले, “प्रथम याजकांस पुढे जाऊ द्या.” जेव्हा याजकांच्या पायाचा स्पर्श पाण्यास झाला तेव्हा यार्देन नदिचा प्रवाह बंद झाला व इस्त्राएल लोक कोरड्या भूमिवर चालत नदिच्या पलिकडे जाऊ शकले.
यार्देन नदी पार केल्यानंतर देवाने यहोशवास सांगितले की कसा प्रकारे ते सशक्त नगर यरिहोवर हल्ला करू शकतात. लोकांनी देवबापाच्या आज्ञेचे पालन केले. देवाने सांगितल्या प्रमाणेच सर्व सैनिकांनी व याजकांनी यरिहो शहरास सहा दिवस प्रत्येकी एक वेळा प्रदक्षिणा घातल्या.
मग सातव्या दिवशी, इस्त्राएल्यांनी आणखी सात वेळा शहरास प्रदक्षिणा घातल्या. शेवटच्या वेळी प्रदक्षिणा घालत असतांना सैनिकांनी गर्जना केल्या व याजकांनी आपली कर्णे वाजवली.
मग यरिहो शहराच्या भिंती कोसळल्या! देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे इस्त्राएल्यांनी शहराचा सत्यानाश केला. त्यांनी केवळ राहाब व तिच्या कुटुंबास जिवंत ठेविले, जे नंतर इस्त्राएल्यांशी एक झाले. जेव्हा कनानमध्ये राहणा-या अन्य लोकांनी ऐकले की इस्त्राएल्यांनी यरिहो नगराचा नाश केला आहे, तेव्हा ते अत्यंत भयभित झाले व इस्त्राएली त्यांच्यावर हल्ला करतील याची त्यांनी भिती वाटली.
देवाने इस्त्राएल्यांस आज्ञा केली होती की त्यांनी कनानी लोकांबरोबर मैत्रीचा करार करू नये. परंतु गिबोनी नावाचा कनानमधील एक लोकगट यहोशवाकडे येऊन सांगू लागला की ते कनानपासून खूप दूर रहात होते. त्यांनी यहोशवास त्यांच्यासोबत मैत्रीचा करार करण्यास विनंती केली. यहोशवा व इस्त्राएल यांनी गिबोनी लोक कोठून आले होते याची देवाकडे विचारपूस केली नाही. म्हणून यहोशवाने त्यांच्याशी मैत्रीचा करार केला.
जेव्हा इस्त्राएल्यांस समजले की गिबोनी लोकांनी त्यांची फसवणूक केली आहे, तेव्हा ते खूप रागावले, पण तरीही त्यांनी तो करार पाळला कारणत्यांनी देवासमोर त्यांना वचन दिले होते. काही काळानंतर, कनानमधील अमोरी लोकांनी ऐकले की गिबोनी लोकांनी इस्त्राएल्यांबरोबर करार केला आहे, तेव्हा त्यांनी आपले सैन्य एकत्र करून गिबोन्यांवर हल्ला केला. गिबोन्यांनी यहोशवाकडे संदेश पाठविला व त्यांना मदतीचा हात देण्याची विनंती केली.
यास्तव यहोशवाने इस्त्राएल्यांच्या सैनिकांस रात्रभर एकत्र करून गिबोन्यांकडे निघाले. पहाटेच त्यांनी अमोरी सैनिकांना आश्चर्याचा धक्का दिला व त्यांच्यावर हल्ला केला.
त्या दिवशी इस्त्राएल्यांच्या बाजूने देव स्वतः लढला. त्याने अमोरी सैनिकांमध्ये गोंधळ निर्माण केला व मोठ्या गारांचा पाऊस पाडला, ज्यामध्ये अनेक अमोरी सैनिक मरण पावले.
देवाने सूर्यास स्तब्ध राहण्याची आज्ञा केली की इस्त्राएली सैनिकांनी अमो-यांचा समूळ नायनाट करावा. त्या दिवशी देवाने इस्त्राएल्यांना मोठा विजय प्राप्त करून दिला.
देवाने त्या सैनिकांस पराजित केल्यानंतर अनेक कनानी लोकगटांनी एकत्र येऊन इस्त्राएल्यांवर चढाई केली. यहोशवा आणि इस्त्राएल्यांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा नाश केला.
या लढाईनंतर देवाने इस्त्राएल्यांच्या प्रत्येक गोत्रास वचनदत्त देशातील भूमि वाटून दिली. त्यानंतर देवाने इस्त्राएल्यांच्या सीमेवर शांती प्रस्थापित केली.
जेव्हा यहोशवा वयोवृद्ध झाला, तेव्हा त्याने सर्व इस्त्राएली जनतेस एकत्र बोलावले. मग त्याने इस्त्राएली जनतेस देवाने त्यांच्याशी केलेल्या सिनाय पर्वतावरील कराराचे स्मरण करून दिले की त्यांनी देवाच्या आज्ञा पाळाव्यात. सर्व जनतेने देवाशी विश्वासू राहण्याचे व त्याच्या आज्ञा पाळण्याचे वचन दिले.