Open Bible Stories Home

3. जल प्रलय

उत्पति 6-8

बऱ्याच वर्षानंतर, पृथ्वीवर खूप लोकवस्ती वाढली. लोक खूपच दुष्ट व अत्याचारी होत गेले. ते एवढे वाईट झाले की देवाने ठरविले की त्यांचा जलप्रलयाने नायनाट करावा.

परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. पृथ्वीवरील दृष्ट लोकांमध्ये राहणारा हा सात्विक पुरु जलप्रलयाविषयी नोहाला सांगितले त्याने नोहाला एक प्रचंड तारु बनविण्यास सांगितले.

देवाने नोहाला 140 मीटर लांब, 23 मीटर रुंद व 13.5 मीटर उंचीची बोट तयार करण्यास सांगितले. त्याने नोहास त्यामध्ये तीन मजले, पुष्कळश्या खोल्या, छत व खिडकी बनविल्यास सांगितले. त्या बोटमध्ये नोहा, त्याचे कुटुंब आणि पृथ्वीवरील प्रत्येक जातीचे पशु प्रलयसमयी राहतात असे बनविण्यास आज्ञा केली.

नोहाने देवाची आज्ञा पाळली. त्याने आपल्या तिन्ही पुत्रांसह देवाने सांगितल्याप्रमाणे जहाज निर्माण केले. हे जहाज बनविण्यासाठी कित्येक वर्षे लागली, कारण ते खूप मोठे होते. नोहाने लोकांना प्रलयाविषयी सांगितले पण कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही.

देवाने नोहा व त्याच्या कुटुंबियांसाठी पुष्पकळसे अन्नधान्या साठविण्यास सांगितले. जहाज तयार झाल्यानंतर देवाने नोटा, त्याची बायको, त्याची मुले व सुना यांना आतमध्ये जाण्यास सांगितले एकूण आठ जण

देवाने नोहाकडे प्रत्येक जातीचे पशु व जंतु पाठविले, अशासाठी की प्रलयापासून त्यांस संरक्षण मिळावे देवाने बलिदान करण्यासाठी सात नर व सात मादी पशु देखील पाठविले. त्या सर्वांनी तारवात प्रवेश केल्यानंतर देवाने स्वतः तारवाचा दरवाजा बंद केला.

आणि मग पाऊस सुरु झाला. चाळीस दिवस व चाळीस रात्र मुसळधार पाऊस पडला.! पृथ्वीवर सर्वत्र पाणी साचले. सर्व पृथ्वी पाण्याने व्यापून टाकली. सर्व पर्वतही बुडाले

आता तारवाच्या बाहेर असलेले सर्व काही प्रलयामध्ये बुडून नष्ट झाले. तारु पाण्यावर तरंगत राहिला व आतील सर्वजण सुरक्षित होते.

पाऊस थांबल्यानंतर तारु पाच महिने पाण्यावर तरंगत होते, मग पाणी ओसरले. मग एके दिवशी तारु एका डोंगराच्या वर थांबले, परंतु संपूर्ण जग अजूनही पाण्याखालीच होते. आणखी तीन महिन्यानंतर पर्वत दिसू लागले.

त्यानंतर आणखी चाळीस दिवसांनी नोहाने एक कावळा बाहेर सोडला. तो कावळा परत तारवाकडे आला कारण त्याला कोरडी भूमी भेटली नाही.

नंतर नोहाने एक कबूतर बाहेर सोडले. परंतु त्यालाही थारा न मिळाल्याने ते परत आले. एका आठवडयाने त्याने पुन्हा एक कबुतर सोडले व ते आपल्या चोचीत जैतुनाचे पान घेऊन आले. पाणी ओसरत होते, आणि वनस्पती वाढू लागला होत्या!

नोहाने आणखी एक आठवडा वाट पाहून त्या कबूतरास तिसऱ्यांदा पाठविले यावेळी त्याला ठिकाण सापडले व ते माघारी आले नाही. आता पाणी पूर्णपणे ओसरले होते.

दोन महिन्यानंतर देव नोहास म्हणाला, तु व तुझे कुटुंब आता तारवाबाहेर येऊ शकता. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा व पृथ्वी व्यापून टाका. मग नोहा व त्याचे कुटुंब तारवाबाहेर आले.

नोटाने तारवाबाहेर अल्यानंतर देवाला पशुयज्ञ अर्पण केला. देवाने नोहाचा यज्ञ ग्रहन केला व त्यास आशिर्वाद दिला.

देव म्हणाला, “मी वचन देतो कि इथून पुढे मी मानवाच्या दुस्तैमुले भूमिस शापित कार्नर नाही किंवा पाण्याने प्रुत्विचा नाश कार्नर नाही जरी मनुष्य सुरुवातिपसुनाच पाप करत अल आहे.”

मग देवाने आकाशामध्ये इंद्रधनुष्य स्थापून नोहा बरोबर करार केला. Eइंद्रधनुष्य जेव्हा जेव्हा दिसते तेव्हा तेव्हा देवाने मानवाबरोबर केलेल्या कराराची आठवण होते.

Next Chapter