Open Bible Stories Home

11. वल्हांडणाचा सण

बायबल कथाः निर्गम ११:१-१२:३२

देवाने फारोला चेतावनी दिली की जर तो इस्त्रायल्यांना जाऊ देणार नाही, तर देव मिसरातील प्रथम जन्मलेल्या मनुष्यांस व प्राण्यांस जीवे मारील. जेव्हा फारोने असे ऐकले तेव्हाही त्याच्यावर काही परिणाम झाला नाही व त्याने इस्त्राएल्यांस सोडले नाही.

प्रत्येक विश्वासणा-याच्या घरातील प्रथम जन्मलेल्यास देवबाप्पाने वाचविण्यासाठी मार्ग काढला. प्रत्येक कुटुंबामध्ये एक निष्कलंक कोकरा मारला गेला.

देवाने इस्त्राएल्यांस सांगितले की त्यांनी कोक-याचे रक्त दरवाजाच्या चौकटीस लावावे आणि त्याचे मांस विस्तवावर भा३जून बेखमिर भाकरीबरोबर घाईघाईने खावे. त्याने त्यांना भोजन झाल्यानंतर मिसर देश सोडण्यास सज्ज राहण्यासही सांगितले.

देवाने सांगितल्याप्रमाणे इस्त्राएल्यांनी सर्व तयारी केली. मध्यरात्रीच्या समयी देवबाप्पाने जाऊन मिसरातील प्रत्येक कुटुंबातील प्रथम जन्मलेल्या पुत्रास मारीले.

इस्त्राएल्यांच्या सर्व घरांच्या दरवाजांवर कोक-याचे रक्त असल्यामूळे देव त्यांस ओलांडून गेला. त्यांच्या घरातील सर्व माणसे सुरक्षित होती. कोक-याच्या रक्तामुळे त्यांचा बचाव झाला होता.

परंतु मिस-यांनी देवावर विश्वास ठेवला नाही व त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. म्हणून देवाने त्यांची सुटका केली नाही. देवाने मिसरातील प्रत्येक प्रतम जन्मलेल्यांस जीवे मारीले.

कारावासातील प्रथम जन्मलेल्या अपत्यापासून तर फारोच्या घरातील प्रतम जन्मलेला प्रत्येक मिस्त्री पुरूष मरण पावला. संपूर्ण मिसर देश शोकसागरामध्ये बुडून गेला.

त्याच रात्री फारोने मोशे व अहरोनास बोलावून म्हटले, “इस्त्राएल्यांना घेऊन लगेच मिसर देश सोडा!” मिसरातील लोकांनीही इस्त्राएल्यांना मिसर देश लगेच सोडण्याची विनंती केली.

Next Chapter